लातूर-(प्रशांत साळुंके):-निलंगा नगरपालिकेच्या वतीने शहरालगत असलेल्या नाल्याला नाला रुंदीकरण करून पाणी आडवा पाणी जिरवा व पाण्याची बचत करत सोबतचं शहरातील लोंकाना गार्डन प्लस मॉर्निंग ॲन्ड इव्हनिंग वॉक घेण्यासाठी भव्यदिव्य देखणा असा अटल वॉक वे तयार करण्यात आला आसुन सायंकाळी विद्युत रोषणाईमुळे हा परीसर उजळून दिसत आहे. अटल वाॅक वे मुळे निलंग्याच्या सौंदर्यात भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब जमीनीत मुरावा व पाणीपातळी वाढावी यासाठी जलयुक्त शिवार योजना आमलात आणली. या माध्यमातून हजारो किमी नाला सरळीकर व खोलीकरणाचे काम करण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंगा शहरालगत असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. याच नाल्यावर युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून निलंगा नगर पालिकेच्या माध्यमातून नाल्याच्या दोन्ही बाजूस जवळपास एक किलोमीटर पेक्षा जास्त सुंदर पेव्हर ब्लॉक युक्त वॉक वे तयार करण्यात आला. त्याच्या दोन्हीं बाजूस विविध प्रकारची वृक्ष लागवड करुन संपूर्ण परीसर हिरवळीने नटविण्यात आला आहे. सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांसाठी वॉकिंग करताना रम्य भक्तिमय संगीत सुविधा, सुरक्षिततेच्या दृष्टीने संपुर्ण परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन त्यात विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आली आहे. ही एक लहान मुलांसाठी पर्वणी ठरत असुन महिलांना व पुरुषांना वेगवेगळे ओपन जीम व बसण्यासाठी आसन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायंकाळी रम्य वातावरणात भर टाकण्यासाठी विविध प्रकारचे कलरफुल कारंजे मन प्रफुल्लित करुन जातात. नाल्यातील पाण्यात जवळपास ५०० मीटर पर्यंत सायकल बोटिंग व्यवस्था. पिण्यासाठी शुध्द पाणी अशी व्यवस्था करण्यात आली असून. सर्व कामे स्वतः अरविंद पाटील निलंगेकर यांनी लक्ष घालून करुन घेतली आहेत. अटल वॉक वे च्या माध्यमातून निलंगा नगरीत आरोग्यासाठी आरोग्यसंपदा प्राप्त करण्यात आली आहे. या अटल वॉक वे मध्ये सुंदर आणि मनमोहक वातावरणात प्रवेश केल्यानंतर आरोग्यसंपदा विषयी रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी पहाटेच्या वातावरणात अनेक सर्वसामान्य नागरिक, महिला आणि बालगोपाळांची व्यायामासाठी मांदियाळी पाहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *