पिंपरी :- ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत विशाल नगर, पिंपळे निलख प्रभाग क्र. २६ येथील निळी पुररेपेतील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय यांनी संयुक्तिक अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाई मध्ये ३८ पत्राशेड असे एकुण अंदाजे ३२,००० चौ.फुट, अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
सदर कारवाई श्री. जितेंद्र वाघ, मा. अतिरिक्त आयुक्त (२), श्री. मकरंद निकम, मा. सहशहर अभियंता, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुनिल भागवानी कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, यांचे नियंत्रणाखाली करणेत आली. सदर कारवाई ड प्रभाग, श्री. संजय तुपसाखरे उप अभियंता, श्री राजेंद्र डुंबरे उप अभियंता, श्रीम. वंदना मोरे कनिष्ठ अभियंता, श्री. सचिन कुतवळ कनिष्ठ अभियंता श्री लवटे कनिष्ठ अभियंता, ड प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- १२ व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ०६ मनपा पोलिस कर्मचारी व सांगवी पोलिस स्टेशन ०५ पोलीस उपनिरीक्षक -१, पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी- २१, पोलिस मुख्यालयातील १ आर. सी. पी., प्लोटुन (१५ पोलिस कर्मचारी) महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ५४ कर्मचारी यांच्या सहाय्याने करणेत आली. सदर कारवाई ३ जेसीबी, तसेच २० मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.