पिंपरी :- गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य गुणवंत कामगार स्नेह मेळावा व कामगार परिसवांदाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे मंडळाच्या संस्थापक – अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी २५ वर्षे केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांजकडून पिंपरी चिंचवड शहरातील हाफकिन जीव औषधे निर्माण महामंडळ या संस्थेला “रायबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार – २०१९” जाहीर झाला असून कामगार क्षेत्रातील महत्त्वाचा राज्यस्तरीय “कामगार भुषण पुरस्कार” कमिन्स इंडिया लिमिटेडचे कर्मचारी, गुणवंत कामगार कवी श्री राजेंद्र वाघ यांना जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि.५ मे २०२२ रोजी दु.३:०० वा. अॅटो क्लस्टर हॉल, चिंचवड येथे गुणवंत कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा भव्य स्नेहमेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यात “महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळल्यानंतर कामगाराची भूमिका कशी असावी” या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.

गुणवंत कामगार कल्याण मंडळ हे कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून वाटचाल करीत आहे.मंडळाच्या कामकाजासाठी राज्यतरीय समिती,पिंपरी – चिंचवड शहर समिती ,पुणे शहर समिती व पुणे जिल्हा समिती तयार करण्यात आलेल्या असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे.त्याचबरोबर शहरातील कामगार भूषण पुरस्कार्थी, सन २०१५,२०१७ आणि २०१९ चे गुणवंत कामगार पुरस्कार्थी यांना *”श्रम गौरव” पुरस्काराने* सन्मानित केले जाणार आहे.तसेच ज्येष्ठ गुणवंत कामगार, पंतप्रधान श्रम पुरस्कारप्राप्त गुणवंत, सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला आणि मध्यवर्ती संचालक मंडळाच्या संस्थेचा येथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

पुणे, पिंपरी – चिंचवड शहर व जिल्ह्यातील सर्व आजी माजी गुणवंत कामगारांनी व श्रमिकानी या मेळाव्यास उपस्थित राहाण्याचे आवाहन गुणवंत कामगार कल्याण मंडळ राज्यस्तरीय समितीचे उपाध्यक्ष राज अहेरराव,तानाजी एकोंडे,सचिव राजेश हजारे,सहसचिव संजय गोळे,खजिनदार भरत शिंदे, सहखजिनदार गोरखनाथ वाघमारे, सदस्य श्रीकांत जोगदंड,कल्पना भाईगडे, पिं. चिं.शहराध्यक्ष बशिर मुलाणी व पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *