उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन केली विचारपूस…
चिंचवड | प्रतिनिधि | दि.१७ एप्रिल :- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच त्यांचे लाखो चाहते काळजीने व्याकुळ झाले आहेत.आमदार जगताप यांना लवकरात लवकर प्रकृती स्वास्थ्य लाभावे, अशी प्रार्थना करून प्रतिभा महिला प्रतिष्ठाण व मुक्तांगण महिला प्रतिष्ठाण तर्फे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर (पिंपळे गुरव) येथील मंदिरात अभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप महिला भगिनी कडून सुरू करण्यात आला आहे.
या वेळी सौ.शुभांगीताई जगताप,सौ.माई ढोरे,सौ.उषाताई मुंढे,सौ.कावेरी सं जगताप,सौ.पल्लवी जगताप,सौ.सुषमा कदम,सौ.माधवी राजापुरे,सौ.वैशाली जवळकर,सौ.शोभा जांभुळकर,सौ.रविना आंगोळकर,सौ.उर्मिला देवकर,वैजंता काशिद ई महीला उपस्थित होत्या.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रथमच जगताप यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी जाहीर माहिती दिलेली आहे. लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील अशी माहिती महेश लांडगे यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रुग्णालयात जाऊन लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्याची डॉक्टरांकडून माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
