रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड येथे ६०० नागरीकांना मोफत चष्मे वाटप तर १२० जणांनी केले रक्तदान…
पिंपरी चिंचवड (प्रतिनीधी):- २५ डिसेंबर म्हटल म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदासजी आठवले यांचा वाढदिवस.आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर आरपीआयचे युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये त्यांनी हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, नेत्ररोग, अस्थिरोग इत्यादी नागरीकांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. नेत्र तपासण्या केल्यानंतर ६०० नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर १२० जणांनी शिबिरामध्ये रक्तदान केले.शिबिराचे उद्घाटन मा नगरसेवक शंकरशेठ जगताप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळासाहेब भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाकड पोलीस निरीक्षक विवेक मुंगळीकर,वाहतूक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजीज भाई शेख, आरपीआय अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजा भाई शेख, उपमहाराष्ट्र केसरी विशाल आप्पा कलाटे, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष भाजपा रामभाऊ वाकडकर, भाजपा सदस्य विक्रम कलाटे, सदस्य अमोल कलाटे, सदस्य श्रीनिवास कलाटे, राष्ट्रवादीचे नेते विशाल साकी गायकवाड, रिपाई उपाध्यक्ष शाहरुख खान, उद्योजग निलेश वाघमारे, रिपाई विद्यार्थी अध्यक्ष सुजित कांबळे, रिपाई युवा नेते किरण समिंदर,रिपाई नेते नितीन आप्पा धोत्रे, सामजिक कार्यकर्त्या मेघा आठवले, युवा उद्योजग सुरज भुजबळ, प्रमोद भुजबळ, सनी भुजबळ, सम्राट मित्र मंडळ अध्यक्ष अविनाश शिरसाट, किरण बनसोडे, विशाल शिंदे, अभिभाऊ कलाटे,राजेश बोबडे, विजय ठोसर,शिबिराचे मुख्य समन्वयक तेजस भगत, आर पी आय एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे,मोहन बनसोडे, वैभव वाघमारे, अजय दूनघव, युवक अध्यक्ष प्रभाग क्रमांक २६ स्वप्निल कसबे आदी उपस्थित होते.
या वेळी मा नगरसेवक शंकरशेठ जगताप आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाले की, शहराचे युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी रामदास जी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबिराचा घेतलेला कार्यक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले व या भागाचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या कार्याला अनुसरून जनतेची सेवा करावी या हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले हे कौतुकास्पद आहे. खुप चांगल्या पद्धतीचे आयोजन येथे करण्यात आलेले आहे. अनेक प्रकारच्या चाचण्या येथे मोफत स्वरुपात ठेवण्यात आलेल्या आहेत. सकाळपासून गर्दी करून नागरिक या शिबीराचा लाभ घेत आहे. असेच समजसेवेचे कार्य कुणाल वाव्हळकर व त्यांची टीम करेल अशी अपेक्षा करतो.
वाढदिवसानिमित्त आठवले साहेबांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. कुणाल यांनी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो. हे शिबीर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे आहे. आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शहर व महाराष्ट्र राज्या सहीत २२ राज्यात कार्यक्रम राबवले जातात.येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला ३० ते ४० जागा मित्र पक्ष म्हणून मिळाल्या पाहिजेत. वाकड भागातुन कुणाल उभा राहणार आहे त्यालाही तिकीट दिले पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळासाहेब भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.
युवक अध्यक्ष वाव्हळकर म्हणाले की, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे.साहेब शोषित पीडित दलितांचे नेतृत्व गेली अनेक वर्ष झाले करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरां नंतर केंद्रीय मंत्री पद आठवले साहेब यांना मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी दलित समाजाला वेळोवेळी न्याय देण्याचे काम केले आहे.येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व शंकर शेठ जगताप यांनी माझ्यावर विश्वास टाकला तर एका सामान्य कार्यकर्त्याचा आवाज महानगर पालिकेच्या सभागृहात घुमल्या शिवाय राहणार नाही.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुणाल वाव्हळकर तर आभार सुजित कांबळे यांनी मानले.