‘आपले आंगण’ कार्यक्रमात बालचमूंनी घेतला जुन्या खेळांचा आनंद…

 

पिपंरी-प्रतिनिधी:- आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि मा. उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांच्या माध्यमातून बाल दिना (१४ ऑक्टोबर) चे औचित्य साधून आयोजित ‘आपले आंगण’ कार्यक्रमात विविध स्पर्धा आणि खेळांचा आनंद लहान मुलांनी घेतला.

 

चिंचवड संभाजीनगर येथील शिव शंभो उद्यानात संपूर्ण दिवसभरासाठी असलेल्या आपले आंगण कार्यक्रमात संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी, विद्यानगर, मोरवाडी या सर्व भागातील मुले सहभागी झाली. जुन्या खेळांचा आनंद घेताना लहान मुले रमल्याचे पाहायला मिळाले. तसेच, प्रभाग क्रमांक १० मधील पिरॅमिड हॉल, शाहूनगर, सिद्धिविनायक गणपती मंदिर, संभाजी नगर, स्वयंभू गणपती मंदिर, संभाजी नगर, मोरवाडी म्हाडा नवीन विरंगुळा केंद्र, रेणुका देवी प्राथमिक विद्यामंदिर. आणि विद्यानगर अशा सहा केंद्रावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

 

प्रभागातील सुमारे १ हजार बालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सहभागी मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या. तसेच, प्रत्येक गटातून विजेत्या तीन मुलांना मा. उपमहापौर तुषार हिंगे आणि आरंभ सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली तुषार हिंगे यांच्या हस्ते सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *