– आमदार महेश लांडगे यांचा राज्यातील २८८ आमदारांसमोर आदर्श
– महाड, चिपळूणसह सांगली कोल्हापूरकडे पूरग्रस्तांसाठी २६ गाड्या मदत रवाना

पिंपरी :- ” हिमालयाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा सह्याद्री धावला”  असा इतिहास आहे. राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून अजरामर कार्य उभा केले. असेच महाराष्ट्रातील २८८ आमदारांना आदर्श ठरेल असे मदतकार्य पिंपरी- चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी  हाती घेतले आहे.

कोकण सह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर मध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल २६ ट्रक घेऊन आमदार लांडगे रवाना झाले आहेत. आपत्तीग्रस्त गावात स्वतः उपस्थितीत राहून मदत करीत आहेत. त्यामुळे “आस्मानी संकटात सापडलेल्या कोकणवासीयांच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्राचा सुपुत्र धावला” अशा भावना पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहेत.

कोकणातील महाड व चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापुर इथे गेल्या आठवडाभरापासून महापुराने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक नागरिक बाधित झाले. अनेकांनी आपला जीव गमावला. याची झळ अनेक कुटुंबांना बसली. शेतकरी बांधवांनी आपली जनावरे गमावली. शेती देखील सध्या पाण्याखाली गेली आहे अशा चहुबाजूंनी वेढलेल्या संकटाचा सामना हे आपले बांधव करीत आहेत यांना सावरण्यासाठी आमदार लांडगे यांनी एक हात मदतीचा, असे आवाहन करीत लोकसहभागातून खारीचा वाटा उचलला आहे. त्यासाठी भाजपा नगरसेवक दानशूर नागरिक संस्था यांना मदतीसाठी आवाहन केले आणि स्वतः देखील या उपक्रमात पुढाकार घेतला.

आमदार लांडगे यांनी केलेल्या आवाहनानुसार तब्बल २६ ट्रक साहित्य जमा झाले आहे. प्रत्येक ट्रकमध्ये सुमारे ६ टन साहित्य आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, किराणा, लहान मुलांचे कपडे आणि अशा गोष्टींचा समावेश आहे. हे साहित्य घेऊन गाड्या आज रवाना झाल्या. भोसरीतील महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून हे साहित्य पूरग्रस्त बांधवांसाठी सुपूर्त करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांची मदत करता आली याचे समाधान…
आमदार लांडगे म्हणाले की, “पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुन्हा एक हात मदतीचा” हा उपक्रम आम्ही हाती घेतला होता पिंपरी-चिंचवडकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापुरामध्ये बाधित झालेल्या कोकणातील महाड व चिपळून तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २६ ट्रक मदत रवाना केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना मानवता धर्माचे पालन करीत मदत करता आली. लोकांनी भरभरून साथ दिली, याचे समाधान वाटते.

पिंपरी- चिंचवड भाजपाने मानवता जपली…
एवढ्या मोठ्या प्रमाणात एका शहरातून मदत देणारे पिंपरी-चिंचवड शहर व आमदार महेश लांडगे हे एकमेव  ठरले आहे. आमदार लांडगे यांच्या या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक करण्यात येत आहे. महापालिका स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनी २ लाख रुपयांचा धनादेश पूरग्रस्तांसाठी सुपूर्द केला आहे. गेला आठवड्यात भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका अश्विनी जाधव, साधना मळेकर, पांडुरंग साने यांच्या पुढाकाराने ७ गाड्या मदत पूरग्रस्त नागरिकांना पोहोच झाली आहे. काही नगरसेवक पदाधिकारी यांनी थेट मदत केली आहे. तर काहींनी आमदार लांडगे यांच्या कार्यललायात मदत सुपूर्द केली आहे. आता आमदार लांडगे २६ गाड्या मदत घेऊन रवाना झाले आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या वतीनेही मदतकार्य सुरू आहे. पुढील आठवड्यात आणखी १२ ते १४ ट्रक मदत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्त नागरिकांना करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *