“महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल!”
पिंपरी :- महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर प्रथम महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली.
डॉ. सुलक्षणा शिलवंत या उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांना आपल्या लहानपणापासूनच त्यांचे वडील दिवंगत डॉ. अशोक शिलवंत यांच्यापासून समाजकारणाचे बाळकडू मिळत आलेले आहे. त्यांच्या आजी देखील समाजकारणात सक्रिय होत्या.त्यामुळे अत्यंत कमी वयात डॉ. सुलक्षणा समाजकारणात उतरल्या असून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून देखील काम केले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणावर पडेल प्रभाव
महिलांच्या सक्षमीकरणाचा समाज, अर्थव्यवस्था, कुटुंब आणि व्यक्तीगत पातळीवर सकारात्मक प्रभाव होतो.महिलांना समान हक्क आणि संधी दिल्यामुळे समाज अधिक समतोल आणि न्याय्य बनतो,महिलांचा सहभाग निर्णयप्रक्रियेत वाढल्याने अधिक प्रगल्भ आणि संवेदनशील निर्णय घेतले जातील,महिलांना शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मिळाल्यास कुटुंबाची आणि देशाची आर्थिक परिस्थिती सुधारेल,उद्योजक महिलांनी सुरू केलेले व्यवसाय स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतील,शिक्षित महिला आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि मूल्ये देऊ शकतात, ज्यामुळे पुढील पिढीही सशक्त बनेल,महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या सुविधा आणि शिक्षण उपलब्ध असल्याने कुटुंबाचे आरोग्य सुधारू शकते,महिलांना शिक्षण, निर्णयस्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन मिळाल्यास त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
महिलांचे सक्षमीकरण ही केवळ व्यक्ती किंवा गटाची बाब नसून, ते संपूर्ण समाजासाठी प्रगतीचे साधन आहे. महिलांना सक्षम बनवले तर संपूर्ण जग अधिक न्याय्य, प्रगत आणि समृद्ध होईल.
महिला उमेदवाराच्या विजयाचा समाजावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, अशी चर्चा देखील पिंपरी मतदारसंघांमध्ये जोर धरू लागली आहे.