पदयात्रा काढून घेतल्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी

पिंपरी,:- राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. 30) प्रचाराचा शुभारंभ केला. बोपखेल येथील ग्रामदैवत बापूजी बुवा मंदिरात बनसोडे यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडला. त्यानंतर त्यांनी बौद्ध विहारला भेट देऊन बोपखेल मध्ये पदयात्रा काढली.

महायुतीचे उमेदवार म्हणून अण्णा बनसोडे यांनी 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. बोपखेल गावापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी उपमहापौर नानी घुले, चेतन घुले, भाऊसाहेब सुपे, संजय अवसरमल, रवींद्र ओव्हाळ, कुमार कांबळे, विनय शिंदे, शशिकांत घुले, महिंद्र वाघमारे, धर्मेंद्र सोनकर, बाळासाहेब भागवत, राखी चंडालिया, सोपान घुले, पांडुरंग घुले पाटील, राजू घुले (शिवछत्रपती पुरस्कार) कर्नल (नि.) पार्ले, कर्नल (नि.) सावंत, स्वप्नील घुले आदी उपस्थित होते.

आमदार अण्णा बनसोडे यांना भव्य पुष्पहार घालून हलगी, फटाक्यांच्या जल्लोषात त्यांचे बोपखेल वासियांनी जंगी स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी आमदार बनसोडे यांचे औक्षण करून स्वागत केले. माजी नगरसेवक अविनाश घुले, सोपान घुले पाटील, स्वप्निल घुले, अतुल नामदेव घुले, राजेंद्र नामदेव घुले, अमोल दशरथ झपके, शिवसेना नेत्या मंगला घुले, संतोष घुले, माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी अण्णा बनसोडे यांनी भेट दिली.

बोपखेलच्या अनेक प्रश्नांसाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. नदीवरील पुलासाठी बनसोडे यांनी पाठपुरावा केला. बोपखेलवासी हे विसरणार नाहीत. अण्णा यांना बोपखेल मधून चांगले मताधिक्य मिळेल, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *