पिंपरी – बदलापूर घटनेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे त्वरित बसवावेत असे नाना काटे यांनी सांगितले.
बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर सतर्कता म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य व सक्तीचे करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बहुतांश प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे दिसून येत आहे. अनेक पालकांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिथे कॅमेरे आहेत ते बंद पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आपण अधिकाऱ्यांच्या मार्फत याबाबतची पाहणी करावी. तसेच महापालिका आणि खाजगी शाळांनाही चांगल्या दर्जाचे व अनेक काळ माहिती संचयित राहील असे सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे आहे अश्या सूचना देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक असून, हे सीसीटीव्ही बसवण्याबाबत हा मुद्दा लालफितीत न अडकवत ठेवता यात कोणतीही चालढकल करता कामा नये व त्वरित आदेश पारित करण्यात यावेत असे नाना काटे यांनी आयुक्त यांना पत्रकात सांगितले.