पिंपरी – एम आय एम  पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता मा.धम्मराज साळवे यांनी  आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत पद्मविभूषण मा.शरदचंद्र  पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष मा.तुषार कामठे यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करत त्यांची पिंपरी चिंचवड शहराच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र दिले.

पदभार स्विकारल्यानंतर धम्मराज साळवे  यांनी असे मत व्यक्त केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्ष पिंपरी चिंचवड वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांनी माझ्यावर सोपवली असून त्यांचा मी आभारी आहे पुढील काळात पक्ष विस्तारासाठी शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या साथीने कार्यरत राहून शहरातील सर्व विधानसभा जिंकण्यासाठी आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची महानगरपालिकेवर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता येण्याकरिता पूर्ण ताकदीने कार्य करणार आहे.

यावेळी शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे यांनी असे मत व्यक्त केले धम्मराज साळवे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षात त्यांच्या प्रवेशाने पक्षाला एक युवा अभ्यासू वक्ता  ,संघटन कौशल्य असलेला,सामाजिक जाणं असलेला,आंबेडकरी चळवळीतील चेहरा आम्हाला मिळाला आहे.त्यामुळे त्यांना  प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात शहर  वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यामुळे पक्षाला निश्चित बळ मिळेल .

यावेळी  शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *