पालिका प्रशासनाने ताबडतोब लक्ष द्यावे… -अमित गोरखे
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात आज पहिलाच जोरदार पाऊस झाला असून यामध्ये खास करून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घराघरात गेलेले आहे, ड्रेनेजचे पाणी या पावसाच्या पाण्यात मिक्स होऊन ड्रेनेज तुमच्या कारणाने घराघरात पाणी गेल्याची परिस्थिती खास करून दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर या भागात झालेली दिसली यातून पालिकेने पावसापूर्वी कुठलीच दक्षता घेतली नाही हे दिसून आले आहे आज पिंपरी मधील भाटनगर, मिलिंदनगर, त्याचबरोबर आनंदनगर अशा मोठ्या वस्त्यांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी घराघरात शिरले असून गोरगरीब जनतेचे साठवलेली धान्य व इतर मोठे नुकसान झालेले आहे, मालिकेचे अधिकारी व प्रशासक निद्रस्थ अवस्थेत असून यावर ताबडतोब पालिकेची बैठक घेऊन खास करून पिंपरी चिंचवड परिसरातील वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांत भागांमध्ये पुढील येणाऱ्या काळात बचावात्मक कारवाई आपण काय करू शकतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे पिंपरी विधानसभा भाजप प्रमुख अमित गोरखे यांनी म्हटले आहे, पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक रोडवर सुद्धा व सोसायटीमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आज बघायला मिळालेली आहे, त्यामुळे ताबडतोब ड्रेनेज, स्ट्रॉंम लाईन्स स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे,
याबाबत आयुक्त तथा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यांना भेटून निवेदन देणार असून यावर ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे जेणेकरून गोरगरीब नागरिकांचे नुकसान होणार नाही असेही म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *