पिंपरी, पुणे (दि. २९ मे २०२४):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.२८ मे) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कामगार कल्याण विभाग अधिकारी प्रमोद जगताप, सह शहर अभियंता गलबले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा सभासदांना १२ % दराप्रमाणे लाभांश मंजूर करण्यात आला. सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासद असणाऱ्या सभासदांचा रोख पाच हजार रुपये व शाल, स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व राज्यस्तरीय खेळाडूंचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सनी कदम, उपाध्यक्ष अनिल लखन, सचिव वैभव देवकर, खजिनदार विजया कांबळे, संचालक चारुशीला जोशी, नथा मातेरे, विश्वनाथ लांडगे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, ज्ञानेश्वर शिंदे, विजय नलावडे, शिवाजी येळवंडे, संदीप कापसे, योगेश रानवडे, विशाल भुजबळ, विजय मुंडे, कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे युनूस पगडीवाले व व्यवस्थापक प्रल्हाद सुतार आदी उपस्थित होते. सर्व विषय सचिव वैभव देवकर यांनी वाचून दाखवले सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.

संस्थेचे सल्लागार मनोज मात्रे माछरे, नितीन समगिर, दिगंबर चिंचवडे, महादेव बोत्रे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, दत्तात्रय ढगे व प्रमोद अंबपकर, मदन चिंचवडे, किसन आरजे, देवराम जगदाळे ,सुहास ताकवले आदी उपस्थित होते.
स्वागत सनी कदम, सूत्रसंचालन प्रल्हाद सुतार आणि आभार अनिल लखन यांनी मानले.
————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *