– आमदार महेश लांडगे यांचा ‘घर टू घर’ प्रचार

– शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य देण्याचा संकल्प

 

पिंपरी | प्रतिनिधी :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत असून नागरिकांचा या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिरूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व घटक पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. महायुतीच्या वतीने आढळराव पाटील यांचा प्रचाराचा जोर मतदारसंघात कायम आहे. त्यातच भोसरी विधानसभेचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आढळराव पाटील यांना 1 लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प केला असून, ठिकठिकाणी जनसंवाद बैठका घेण्यात येत आहेत. याद्वारे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे केंद्र सरकार आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने घेतलेली महत्त्वकांक्षी निर्णय, कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याबाबत तळागाळातील नागरिकांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे.

‘जनसंवाद..च्या माध्यमातून भाजपा- शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. या निवडणुकीत मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवतील आणि भारत एक बलशाली राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान करतील, असा विश्वास आहे. जनसंवाद बैठकांना नागरिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळत असून आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभेतून मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे.

– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरूर लोकसभा, भाजपा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *