पिंपरी, दि. 12 एप्रिल – महात्मा ज्योतिबा फुले यांनी
माणसाला माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान दिले, असे गौरवोद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.
महात्मा जोतीराव फुले जयंती महोत्सवानिमित्त गुरुवारी रात्री पिंपरी वाघेरे येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार बारणे यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
त्यावेळी संदीप उर्फ नंदू कुदळे, अजय कुदळे, गणेश कुदळे, संतोष कुदळे, प्रवीण कुदळे, संदीप वाघेरे आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले की, महात्मा फुले हे थोर समतेचा संदेश देणारे विचारवंत, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाज सुधारक व शेतकऱ्यांचे कैवारी होते. महात्मा फुले यांची शिकवण आचरणात आणणे, हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल.
पिंपरी वाघेरे येथील दक्षिणमुखी श्रीराम मंदिर सेवा समिती व ग्रामस्थ आयोजित प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासही खासदार बारणे यांनी उपस्थिती लावली.
काळेवाडीत भेटीगाठी
खासदार बारणे यांनी काल (गुरुवारी) संध्याकाळी काळेवाडी भागातील लोकप्रतिनिधी व महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांच्या घरी जाऊन भेटीगठी घेतल्या. त्यांच्यासमवेत पीसीएमटी चे माजी सभापती प्रकाश मलशेट्टी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख दिलीप कुसाळकर तसेच मधुकर काळे, नाथा काळे, सुनील पालकर, तानाजी बारणे, बाळासाहेब गायकवाड, विनायक पिंगळे आदी पदाधिकारी होते.
माजी नगरसेविका उषा दिलीप काळे, भाजपाच्या पदाधिकारी संगीता रोडगे, माजी नगरसेविका विमल रमेश काळे, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश लोहार, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, उद्योजक मल्लेश कद्रापूरकर, सामाजिक कार्यकर्ते नेताजी नखाते, माजी नगरसेवक कुमार जाधव, नीता पाडळे, सुरेश नढे पाटील, नवनाथ नढे पाटील, अश्विनी चंद्रकांत तापकीर, सोमनाथ तापकीर, हेमंत तापकीर, राज तापकीर, संगीता तापकीर, विनोद ज्ञानेश्वर तापकीर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, मनसेच्या पदाधिकारी अनिता पांचाळ यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी भेट दिली.
काळेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. त्यावेळी मंदिराचे प्रमुख सेवेकरी प्रशांत कंग्राळकर यांनी त्यांचे स्वागत करून मंदिराच्या वतीने आशीर्वाद म्हणून प्रसाद दिला. काळेवाडीत ठिकठिकाणी फटाके वाजवून, औक्षण व सत्कार करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
रमजान ईद निमित्त शुभेच्छा
काळेवाडी येथील पीर पाशा अब्दुल कादर जमादार अर्थात पाशाभाई, वाकड येथील बशीर शेख व तौसिफ शेख, चिंचवड दळवी नगर येथील माजी नगरसेविका शमीम पठाण, कामगार नेते इरफान सय्यद यांच्या निवासस्थानी भेट देऊन खासदार बारणे यांनी त्यांच्या परिवारास व सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.