पिंपरी दि ६ :-
क्रिएटिव्ह अकॅडमीचा प्रमुख नौशाद शेख याच्या विरोधामध्ये एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषण व अत्याचार संदर्भात पोलीसात तक्रार दाखल केली आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू झाला वास्तविक 2014 मध्ये सुद्धा लोणावळ्यातील एका विद्यार्थिनीवर असाच प्रकार झाला होता आणि तिने याबाबतीत तक्रार सुद्धा दाखल केली होती तेव्हा त्या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख विरोधात आंदोलनही झालं होतं त्याला पोलीस कस्टडी सुद्धा मिळाली होती. 2014 नंतर 2024 मध्ये आता पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अतिशय योग्य रीतीने संपूर्ण तपास आपल्या हाती घेतलेला आहे. अकॅडमीच्या विद्यार्थिनींची महिला पोलीस संपर्क करीत आहेत व ते विद्यार्थिनींचे समुपदेशन करत आहेत याच्या माध्यमातून अनेक धक्कादायक माहिती आपल्यासमोर येत आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर या प्रकरणांमध्ये अजून काही विद्यार्थिनींनी तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे व पोलिसांच्या माहितीनुसार किमान यामध्ये 13 ते 14 विद्यार्थिनी अडकलेल्या आहेत अशी गंभीर बाब यातून उघड झाली आहे मुळात 2014 ते 2024 या कालावधीमध्ये एकही फिर्याद दाखल झाली नाही किंवा कोणतीही माहिती समोर आली नाही परंतु पोलीस त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा सर्व तपास करत आहेत. कदाचित या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थीनी संदर्भात ही गंभीर बाब घडली असण्याची शक्यता आहे पोलीस त्या अनुषंगाने सुद्धा तपास करत आहेत. काही विशिष्ट बाबींकडे आपण लक्ष दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पोलिसांना तपास करण्यास सांगितले आहे.

तिथे शिकत असलेल्या विद्यार्थिनींचा माइंड वॉश करून त्यांना इस्लाम मध्ये धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले जात होते का? विद्यार्थिनीचा वेश्या व्यवसायासाठी काही उपयोग केला गेला आहे का ? त्यांचे अश्लील चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे का?

अशा वेगवेगळ्या मार्गाने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली आहेत आणि यात काही प्रमाणात पोलीस प्रशासनाला यश आले असे दिसत आहे. तेथील काही विद्यार्थिनींना बलपूर्वक बळजबरीने मारहाण केली जात असत लेडीज हॉस्टेलमध्ये नौशाद शेख हा वास्तव्यास होता तो रात्रभर तिथे राहायचा आणि काही विद्यार्थिनींना अश्लील चाट करणं अश्लील संभाषण करणे अशी वागणूक त्याची विद्यार्थिनी सोबत होती असे भरपूर मुद्दे आता समोर येत आहेत काही विद्यार्थिनींना भिंतीवर डोकं आपटणे लाताबुक्याने मारहाण करणे असे सुद्धा अनेक प्रकार आता समोर येत आहेत.

या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पिंपरी चिंचवड शहरात किंवा इतर ठिकाणी असे अकॅडमी चालवणाऱ्या संस्थांचा शोध घेऊन विद्यार्थिनीचे होत असलेले शोषन थांबविणे गरजेचे आहे, तसेच या नौशाद सारख्या विकृतीला पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर शिक्षा करून अशा अकॅडमी किंवा संस्था त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज च्या वतीने करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *