पिंपरी, पुणे (दि २८ जानेवारी २०२४):- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२४” देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २०२३ मध्ये निवडणूक साक्षरता अभियान अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार, लोकशाही यासंबधी केलेली जागृती, नवमतदार नोंदणी करणे यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम पीसीसीओईने राबविले. त्याबद्दल “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२४” देऊन आणि उत्कृष्ट नोडल ऑफिसर म्हणून प्रा. दिनेश कुटे यांना गौरविण्यात आले.
पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात (दि.२५ जानेवारी) झालेल्या कार्यक्रमात यावेळी पुणे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पुणे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्विप नोडल अधिकारी पुणे जिल्हा अर्चना तांबे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल ऑफिसर तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिनेश कुटे व विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित बनसोडे यांनी पुरस्कार स्वीकारला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता डॉ. प्रविण काळे, विद्यार्थी कल्याण व विकास सह अधिष्ठाता डॉ. अजय गायकवाड यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
————————————