शांततेत अथवा मूक मोर्चा आंदोलन न होता, हातात दांडके आणि तलवारी घेऊन आंदोलन करण्याचा इशारा…

पिंपरी, दि.9 – मराठा आरक्षणाबाबत दिशाभूल करण्याचा महाराष्ट्रतील मराठयांना प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्याचा घाट घातला जात आहे. हे आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रतील मराठयांना दिले गेले पाहिजे. नाही तर ओबीसीमधून स्वतंत्रपणे आरक्षण दयावे. अन्यथा यापुढे शांतता मार्गाने तसेच, मूक मोर्चा आंदोलन न होता, हातात दांडके आणि तलवारी घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सकल मराठा आरक्षणाबाबत छावा संघटनेची भूमिका स्पष्ट करताना ते पिंपरी येथे पत्रकार परिषद बोलत होते.

यावेळी आखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, प्रदेश महासचिव मनोज आण्णा मोरे, मार्गदर्शक प्राध्यापक सत्यशील सांवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, सचिन लिमकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल भराटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगिता नाईकरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुशिला मोरे, महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्ष आशा फडके, पुणे जिल्हाअध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी विलास पाटील, पुणे जिल्हाअध्यक्ष विध्यार्थि आघाडी, पुणे जिल्हा वाहतुक आघाडी राहुल शिर्के, पुणे जिल्हा संघटक बिट्टू पांचाळ, जालना जिल्हा अध्यक्ष राधेश्याम पवळ, पुणे शहरअध्यक्ष नाना कुंभार, पिंपरी चिंचवड शहरअध्यक्ष गणेश जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भिसे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विध्यार्थि आघाडी विजय हजारे, पुणे जिल्हा सचिव वृशाली मतकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेघा चव्हाण, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पुणे जिल्हा कार्यध्यक्ष महानंदा चव्हाण, खेड तालुका अध्यक्ष रंजना फुलारी, खेड तालुका उपाध्यक्ष सुधा आगरकर, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष गणेश वाघमारे,खोबरे आण्णा आदी
उपस्थित होते.

नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. विविध कामे घेऊन ते दिल्लीत हजारो वेळा जातात. मराठा आरक्षणासाठी एकदा दिल्लीत जावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. मराठा समाजाची अपेक्षा पूर्ण होत नसेल तर, येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. त्यादिवशी अनेक मंत्री येथे येऊन झेंडा फडकवतात. रोज आत्महत्या होत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही कोठेही झेंडा फडकू देणार नाही. मंत्र्याच्या गाड्या फुटतील की पेटवतील ते त्या वेळेस कळेल. त्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल. 17 तारखेपूर्वी आरक्षणाचा मुद्दा सोडून मराठा समाजास न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *