पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या पदाचा पदभार घेतल्यापासून त्यांना जेमतेम वर्षाचा कार्यकाळ दीड महिन्यात पूर्ण होत आहे. मात्र या वर्षभरात त्यांनी जी किमया करून दाखवली आहे ती पाच पाच वर्षे आयुक्त म्हणून काम करणाऱ्यांनाही जमलेली नाही. शेखर सिंह यांनी दिखाव्याच्या विकासाला महत्त्व दिले नसून खऱ्या अर्थाने या शहराला आवश्यक असलेल्या गरजांचा आढावा घेऊन त्याचाही प्राथमिकता क्रम निश्चित केला आहे. व त्यानुसार त्यांनी शहराच्या विकासाचे नियोजन व आरेखन केले आहे. या गरजा परिपूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या ऐवजी भविष्यात कधीच अडचण भासू नये अशा प्रकारे त्यांनी चालू केलेले मिशन पिंपरी चिंचवड शहराला भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
हे करत असताना शहरातील सर्वसामान्यांचा त्यात सहभाग असावा. सर्वसामान्य माणसाला चालू असलेल्या विकासाची माहिती मिळावी असेही त्यांनी प्रयत्न केले आहेत. आयुक्त शेखर सिंह हे करत असलेल्या कामाचे मूल्यमापन या शहरातील काही तथाकथित स्वतःला बुद्धीवादी समजणारे करू शकत असले तरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी मात्र त्याचे मूल्यांकन केले आहे ते पाहिले तर शेखर सिंह यांच्या विकासाच्या संकल्पनांची माहिती नक्कीच मिळू शकते. स्मार्ट सिटी मिशन च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयसीसी सेंटरच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात एक विद्यार्थी आपले मत व्यक्त करताना म्हणतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वेलन्स अतिशय स्ट्रॉंग आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी ज्या पद्धतीने नियोजन केले आहे ते पाहिले तर शहरातील सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पार्किंग सेन्सर आधी सारख्या गोष्टी महापालिका प्रशासनाच्या योग्य प्रकारे नियंत्रणाखालीच आहेत.
पश्चिम बंगाल होऊन आलेली एक विद्यार्थिनी आपे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की पिंपरी चिंचवड महापालिकेचे डेटा कंट्रोल आणि त्याचे एनालिसिस अतिशय उत्तम प्रकारे आहे. या दोन विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया अतिशय बोलके आहेत विकासाचा विचार किती ग्रासरूट पासून केला जात आहे हे यावरून दिसते आणि याचे सर्वस्वी श्रेय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना जात आहे.
केवळ भल्या मोठ्या इमारती बांधून शहराचा विकास होत नाही तर शहराला आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मायक्रो नियोजन आवश्यक आहे आणि ते व्यवस्थितपणे डेटा हाताशी असेल तरच करता येऊ शकते या माहितीमधून शहराला कोणत्या गरजा आहेत. किती प्रमाणात आहेत हे निश्चित करून ते सोडविण्यासाठी केली जाणारी उपाययोजना ही दीर्घकालीन ठरू शकते. अशाप्रकारे विकासाचे नियोजन करणारे या शहराला लाभलेले शेखर सिंह हे आजवरचे एकमेव आयुक्त म्हटले पाहिजेत.
