दापोडी पोलिस चौकी प्रशस्त नूतनीकरण करून स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्यात साठी तसेच विविध आरक्षित प्रकल्प पूर्ण करण्या बाबत पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे भाजपा सचिव विशाल वाळुंजकर मागणी…!

पिंपरी :- दापोडी ही पिंपरी चिंचवड शहरातील मोठी लोकसंख्या असलेली उपनगर असून, वाढत्या लोकसंख्या मुळे याचा शासकीय व पोलीस प्रशासनावर याचा ताण येत आहे…!!
वाढत्या शहरी व भौगोलिक दृष्टिकोनातून दापोडीनगरीतील व उपलोक वस्ती आरक्षित जागांचा विकास झालेला दिसून येत नाही. शासकीय कार्यालय व नागरी सुविधा संदर्भात विकास झालेल्या दिसून येत नाही, तसेच भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या चौकी मुळे अतिरिक्त भार येऊन याचा पोलीस प्रशासनाच्या कामावर ताण पडत आहे,असे विशाल वाळुंजकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

दापोडी, फुगेवाडी, कुंदननगर कासरवाडी, भागातील वाढत्या गुन्हेगारी चे प्रमाण लक्षात घेता दापोडी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्याची आवश्यकता आहे तरी आपण दापोडी उपनगर भागातील आरक्षित जागांचा विकास व दापोडी ते स्वतंत्र पोलीस स्टेशन करून अत्याधुनिक पोलीस स्टेशन निर्मिती करण्यात यावी… या बाबत मागणी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे निवेदनात केली आहे.यावेळी पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे,विजय सिनकर,राजेंद्र बाबर निवेदन देताना उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *