पिंपरी, दि. २१:- जेष्ठ पत्रकार मनीष उंब्रजकर (वय-५३) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. तरी सर्व पिंपरी चिंचवड पत्रकारांच्या वतीने आज दि.21/04/2023 रोजी सायं. 5 वा. भा.वी.कांबळे पत्रकार कक्षात श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अति.आयुक्त उल्हास जगताप, ज्येष्ठ पत्रकार अवधूत कुलकर्णी, विभागिय सचिव- नाना ऊर्फ अरूण कांबळे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष- प्रवीण शिर्के आदी उपस्थित होते.

यावेळी अति.आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, जेष्ठ पत्रकार मनीष उंब्रजकर हे अत्यंत शांत व मनमिळावू अशा स्वभावाचे होते. तसेच पिंपरी चिंचवड शहरात सकाळ, इंडिनय एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रांतून त्यांनी पत्रकारिता केली. त्यांनी लिहिलेल्या बातमीमुळे अनेक प्रश्न सटले असे त्यांनी सांगितले.

विभागिय सचिव- नाना ऊर्फ अरूण कांबळे म्हणाले, जेष्ठ पत्रकार के.डी. गव्हाणे व मनीष उंब्रजकर यांच्या जाण्याने पत्रकार क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

यावेळी आविनाश आदक, रोहित खगेँ, राजू वारभुवन, अर्चना मेंगडे, सीता जगताप, मारूती बाणेवार, बाबू कांबळे, दिलीप देहाडे, विनायक गायकवाड, राम बनसोडे, गणेश मोरे, देवा भालके, अशोक कोकणे आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *