पिंपरी, ता. २०: शिवजयंती उत्सवाचे निमित्त साधत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदारसंघातील अनेक भागातील मंडळांना भेटी देत तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज यांच्याप्रति आदर व्यक्त केला.
रावेत, काळेवाडी, रहाटणी, कोकणे चौक, वाकड अशा विविध भागांतील  मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. अनेक मंडळांनी यानिमित्त आकर्षक रोषणाई केली होती.   यावेळी कलाटे यांनी
पोटनिवडणुकीत शिट्टीचे बटण दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले.
याप्रसंगी राहुल कलाटे यांच्यासमवेत छायाचित्रे काढून घेण्यासाठी तरुणाईने ठिकठिकाणी गर्दी केली होती. चिंचवड येथील वाल्हेकरवाडी मधील श्री विठ्ठल तरुण मंडळ व स्वराज्यरक्षक  छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सवात कलाटे यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कलाटे यांच्यासमवेत छायाचित्रे काढली. रावेत येथील प्रोबो पोलीस  सोसायटीतील कार्यक्रमात बालचमूने फेटे बांधत उत्साहात कलाटे यांच्यासमवेत छायाचित्रे काढली. रावेत येथील शिंदे वस्ती येथे रस्त्याने जाणारी शिव जयंतीची मिरवणूक पाहताच कलाटे थांबले आणि तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मंडळांचे कार्यकर्ते रंगीबेरंगी शिट्ट्या वाजवून कलाटे यांना पाठिंबा देत होते. तसेच अनेक मंडळांनी त्यांचे सत्कारही केले.
रक्तदान शिबिरास भेट
चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे आयोजित रक्तदान शिबिरालाही राहुल कलाटे यांनी भेट दिली. यावेळी कलाटे यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *