राहुलदादा यांना गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रतिसाद
केलेल्या विकासकामांचा नागरिकांकडून गौरव ; अशाच सहकार्याचीही अपेक्षा

पिंपरी : वाकड आणि पुनावळे परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदारांशी शनिवारी (ता. १८) वैयक्तिक संपर्क साधला. अनेक सोसायट्यांमध्ये राहुलदादा सोसायटीच्या गेटजवळ येताच संबंधित रहिवासी त्यांच्या स्वागताला येत होते. महाशिवरात्री निमित्त चिंचवड परिसरातील अनेक महादेव मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

या भेटी दरम्यान राहुलदादा स्थानिक रहिवाशांच्या समस्या मन लावून जाणून घेताना दिसत होते. वाकड परिसरातील फ्लोरेंसिया सोसायटीत बोलताना दादा म्हणाले, ” सत्तेत असूनही सत्ताधाऱ्यांनीही काही केले नाही, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. त्यासाठी तुम्हाला नेहमी भेटू शकेल असा उमेदवार निवडून द्या. भूमकर चौकात पाण्याची १ कोटी लिटर पाण्याची टाकी बांधली आहे. मला निवडून दिले तर पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न कारेन. त्यासाठी शिट्टीचे चिन्ह दाबून मला मतदान करा.” शहरात महापालिकेचे पहिली सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित शाळा सुरु केल्याचे दादांनी आवर्जून नमूद केले. सोसायटीतील काही रहिवाशांनी दादांनी इमारतीच्या पूर्णत्वाच्या दाखल्याचा आणि पाणी पुरवठ्याची क्षमता महापालिकेकडून वाढवून दिल्याची आठवण यावेळी आवर्जून सांगितली. ” त्यानंतर मानकर एम्पायर, शिवांगण, गणेश इम्पेरिया, स्पायरिया अशा अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन तेथिल मतदारांशी संपर्क साधला. निवडून आल्यावर तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असेन, अशी ग्वाही राहुलदादांनी शिवांगण सोसायटीतील रहिवाशांना दिली. तसेच केवळ सोसायटीचीच नव्हे तर अन्य कोणतीही अडचण असेल तर कळवा, असे त्यांनी आवर्जून मतदारांना सांगितले. दादांना केवळ एक फोन करताच पदपथांची तातडीने दुरुस्ती झाल्याचे गणेश इम्पेरियामधील नागरिकांनी सांगितले.

विक्रम विनोदे यांना शुभेच्छा
राहुलदादांचे कार्यकर्ते विक्रम विनोदे यांना एवढ्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढत वाढदिवसानिम्मित त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत राहुलदादा यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. तसेच काही वेळ त्यांच्यासमवेत चर्चाही केली. राहुलदादा यांच्यासमवेत फोटो काढून घेण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती.

त्यानंतर पुनावळे येथील सारा मेट्रो व्हीले यासह अन्य सोसायट्यांमधील रहिवाशांशी त्यांनी संपर्क साधून त्यांना कोणत्या समस्या जाणवत आहेत, हे जाणून घेतले. इथंही दादा येताच युवतींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळचे वातावरण अत्यंत सौहार्दपूर्ण होते.

महादेव मंदिरांमध्ये दर्शन
शहरातील अनेक महादेव मंदिरामंध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर चिंचवडमधील चिंचवडेनगरमधील श्री भोलेश्वर प्रतिष्ठानचे शंकर मंदिर, बिजलीनगरमधील विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळाचे महादेव मंदिर, इंदिरानगर- दळवीनगर येथील महादेव मंदिर, धनेश्वर मंदिर आदी ठिकाणी शंकराच्या पिंडीचे त्यांनी दर्शन घेतले. गर्दीत असूनही अनेक मतदार त्यांना हात दाखवून अभिवादन करीत होते.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *