काळेवाडी, दि. 17 – गुरुवार तसा उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या विश्रांतीचा दिवस. कारण बहुतांशऔद्योगिक कंपन्यांना सुट्टी असते. मात्र 16 फेब्रुवारीचा गुरुवार चिंचवड मतदारसंघ प्रचारफेऱ्यांनी व पदयात्रांनी ढवळून काढणारा ठरला ! चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ गाठी-भेटी आणि कोपरा सभांचा धडाका सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या अन्य घटक पक्षांच्या घरोघरी पोहोचण्याच्या यंत्रणेचे मतदारांमध्ये कौतुक होत आहे. या सर्व वातावरणामुळे चिंचवड मतदारसंघात ‘राष्ट्रवादी पुन्हा’ चाच प्रत्यय येणार असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नाना काटेंच्या या प्रचार धडाक्यामुळे विरोधकांच्या उरात मात्र धडकी भरली असल्याची चर्चा रंगली आहे.

गुरुवारी सकाळपासूनच महाविकासआघाडीचे  उमेदवार नाना काटे यांच्या पदयात्रेस सुरुवात झाली. ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी प्रभाग क्रमांक 31 व 32 मधील काळेवाडी, ज्योतिबा नगर, तापकीर चौक, तापकीर नगर, तापकीर माळ चौक, भारतमाता चौक, विष्णुराज चौक या भागात नानांनी ज्येष्ठ नागरिक व माता-भगिनींच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी महिलावर्गाने त्यांचे औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनी हात उंचावून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिला. तरुण मुले व मुली उत्स्फूर्तपणे त्यांच्या पदयात्रेत सहभागी झाली.

सायंकाळच्या सत्रात काळेवाडी, विजयनगर प्र. क्र. 31 परिसरातील गणपती मंदिरापासून नाना काटेंच्या पदयात्रेस प्रारंभ झाला. त्यानंतर आदर्श नगर – भोईर मार्ग – नवरत्न चौक – अल्फोन्सो स्कूल रोड – कारवार चौक – प्रकाश नढे यांचे घर – साई एन्क्लेव्ह रोड – सत्संग रोड – ज्योतिबा मंगल कार्यालय – निर्मल स्कूल रोड – गणेश कॉलनी – निर्मल स्कूल रोड – ज्योतिबा मंदिर समोर – नंदादीप कॉलनी – संघर्ष कॉलनी – जय मल्हार चौक – क्रांतीवीर कॉलनी – शिवकृपा कॉलनी – सुयोग कॉलनी – साई कॉलनी – प्रेम लोक कॉलनी – शिवशक्ती कॉलनी – पवना चौक – श्रीकृष्ण कॉलनी – 1,2,3 – पंचनाथ चौक – दीपक अंकुश घरासमोरून- भारत माता चौक-माने शाळा मार्गे ही पदयात्रा गेली. यावेळी मतदारांनी काटे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर राजवाडा लॉन्स येथे कोपरा सभा घेण्यात आली.

या पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य दिलीप काळे, माजी नगरसेविका उषा काळे, माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, शाम लांडे, राहूल भोसले, शिवसेना नेते हरीष नखाते, राष्ट्रवादीचे नेते विजयराव सुतार, काँग्रेस शहराध्यक्षा सायली किरण नढे , मा.ड. प्रभाग स्वीकृत सदस्य नवनाथ नढे, युवा कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, विवेक तापकीर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष संतोष काटे, सचिन काळे, रवी नागरे, सुभाष लोंढे, बजरंग नढे, सनी नढे, नीलेश मराठे, संगीताताई कोकणे, इलियास सय्यद, अश्विनी तापकीर, सुजाता नखाते, मोनिका नढे, हेमंत काटे, चेतन काटे, योगेश काटे, अंकित काटे, धनंजय मेटे, बापू जंजाळे, हितेश ढगे, दीपक अंकुश, मनोज म्हस्के आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाजीप्रभू चौक येथे या पदयात्रेचा शेवट करण्यात आला.

प्रचारात महाविकास आघाडीची एकजूट !
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरत आहे ती महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे ! प्रचारावेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला आहे. यामुळे उमेदवार नाना काटे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ‘छोट्या कार्यकर्त्यांनी’ ! या परिसरातील चिमुकल्या मुलांनी चक्क नाना काटेंच्या फोटोंचे मुखवटे लावून त्यांचे अनोखे स्वागत केले. या आगळ्या वेगळ्या स्वागताने नाना भारावून गेले होते. मतदारही नसलेल्या या चिमुकल्यांनी नाना काटेंच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. मग नानांनीही या चिमुकल्यांसोबत मनसोक्त फोटो, सेल्फी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *