पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या बदली नंतर लगेच काही दिवसानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची पुन्हा भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेत  उचलबांगडी  करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (मंगळवारी) काढले आहेत.

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची 12 फेब्रुवारी 2021 रोजी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली होती. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला होता. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबतच ढाकणे यांनीही पदभार स्वीकारला होता.

राजेश पाटील यांचे निकटवर्तीय अशी ढाकणे यांची ओळख होती. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर 16 ऑगस्ट 2022 रोजी पाटील यांची तडकाफडकी बदली झाली. नवीन आयुक्त शेखर सिंह यांच्याशी ढाकणे यांचे सूत जुळले नाही. पाटील यांच्या बदलीनंतर एका महिन्याच्या आतमध्येच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *