भोसरी :- देव-देश अन्‌ धर्माभिमान जागृत ठेऊन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या निमित्ताने सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी तिसऱ्यांना आपले प्रतिनिधीत्व विधानसभा सभागृहात करण्याची संधी दिली. याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो.

विधानसभा निवडणुकीची ‘हॅट्रिक’ करण्यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून अविरत कष्ट करणारे माझे सर्व सहकारी, भाजपा परिवार आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, हिंतचिंतक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कदापि तडा जावू देणार, असा ‘शब्द’ देतो.

पिंपरी-चिंचवडकरांचा निरंतर विश्वास,
भोसरी मतदार संघाचा आता शाश्वत विकास..!

अजेय भारत… अजेय भाजपा… अजेय महायुती…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *