पिंपरी : पश्चिम बंगाल, बदलापूर, कोल्हापूर या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घडलेल्या घटना अत्यंत दुदैवी आहे.  समाज मन दुखावणा-या, महिला अत्याचाराच्या या घटनेचा  भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात राज्यात सर्वत्र “जाणीव जागर” करण्यात येत आहे.
या अनुषंगाने भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने काळ्या फिती बांधून “जाणीव जागर” करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात चिंचवड स्टेशन चौक येथे क्रांतिवीर वस्ताद लहूजी साळवे पुतळ्यास पुष्पार्पण करून या जाणीव जागराला सुरुवात झाली. यावेळी, नागरिकांना स्त्री सुरक्षा विषयक शपथ देण्यात आली.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले कि, बदलापूर, कोल्हापूर, पश्चिम बंगाल या सारख्या घटना अत्यंत दुदैवी आहे. या घटनेचे भाजपा कुठलेही समर्थन करीत नाही. या घटना समाज मन दुखावणाऱ्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची जनता या घटनेतील परिवारासोबत आहे. आमच्या सर्वांच्या संवेदना कुटुंबियांसोबत आहे. अशा घटना होऊ नये. याकरिता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रभर जागर जाणिवेचा याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करीत आहे. अशा घटना होऊ नये, याकरिता संपूर्ण महाराष्ट्राला सोबत घेतलं पाहिजे. अशी आमची भूमिका आहे. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. सरकारने आपले अधिकार वापरुन या महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला कठोर शासन व्हावे, अशी आमची भूमिका आहे.

यावेळी, प्रदेश सदस्य माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, संतोष कलाटे, महेश कुलकर्णी, भाजप सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, उपाध्यक्ष  आबा वाल्हेकर,  मंडळ अध्यक्ष सोनामाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, माजी नगरसेवक सुरेश भोईर, संतोष कांबळे, बाबा त्रिभुवन, राजेंद्र गावडे, सागर आंघोळकर, साविताताई खुळे, अश्विनी चिंचवडे,  निर्मलाताई कुटे,  कोमल शिंदे, जयश्री मकवाना, कमलेश बहरवाल, शेखर चिंचवडे, दीपक भोंडवे, सिद्धेश्वर बारणे, संतोष टोणगे, भूषण जोशी, खंडू देवकथोरे, प्रदीप बेंद्रे, संजय परळीकर यांच्यासह विद्यार्थिनी तसेच जिल्हा पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी/ प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी, विधानसभा वॉरियर्स, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते तसेच, नागरिक उपस्थित होते.

कोट…
महिला अत्याचाराच्या घटनांचा आम्ही निषेध करतो. जे घडले ते वाईट होते. समाजात अशा घटना घडू नयेत, आपल्या महिला भगिनी सुरक्षित रहाव्यात म्हणून आम्ही महाराष्ट्र भर हा “जाणीव जागर” करीत आहोत. हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता आणि होऊ शकत नाही. अशा घटनांचे भाजप समर्थन करीत नाही. महिलेला न्याय मिळाला पाहिजे, हीच भाजपची भूमिका आहे, म्हणून लाडकी बहीण, बसच्या तिकीटमध्ये सवलत, लखपती दीदी, लेक लाडकी अशा अनेक योजना महायुती सरकार आणते आहे. महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण हेच भाजपचे ध्येय आहे.

–  शंकर जगताप, शहराध्यक्ष – भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *