मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रत मोठे यश मिळाल्याबद्दल महाराष्ट्रप्रदेश काँग्रेस कमिटी सेल व विभागाच्यावतीने दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व नानाभाऊ पटोले यांचा सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला असून यात प्रदेश काँग्रेसच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्वाचे ठरले आहे. या सर्वानी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवण्याचे काम केले. तसेच काँग्रेसच्या ‘५ न्याय ५ गॅरंटीचे न्यायपत्र घरोघरी पोहचवण्याचे काम केले आहे. लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा, असे आवाहन यावेळी उपस्थितांना नानाभाऊ पटोले यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेल व विभाग प्रमुख प्रज्ञा वाघमारे यांनी केले.

या कार्यक्रमास प्रभारी रमेश चेन्नीथलाजी, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू, एस.सी. विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटिया, अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, सेल व विभागाच्या प्रमुख प्रज्ञा वाघमारे, राष्ट्रीय समन्वयक अनुसूचित जाती विभाग श्री जयप्रकाश नारनवरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमोद मोरे, प्रतिभा शिंदे, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षा दीपा चक्रबोर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांतदादा लोंढे यांचा कार्य अहवाल व लोकसभेचा कार्य अहवाल प्रदेशाध्यक्ष यांना सादर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *