पिंपरी :- रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी पिंपरी येथील पुतळ्याला संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे महासचिव संतोष शिंदे यांनी जयंतीनिमित्त असे मनोगत व्यक्त केले की अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,महासचिव संतोष शिंदे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर गायकवाड,प्रल्हाद कांबळे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होतें.
