पिंपरी : शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जाणे गरजेचे आहे. लोकांचे प्रश्न समजून घेऊन काम करणे गरजेचे आहे असे आमदार रोहित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना रोहित पवार यांनी उत्तरे दिली. यावेळी त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.

आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी राज्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर भाष्य करताना राज्याचे गृहमंत्री फडणवीस हे विरोधकांचे पक्ष व कुटुंबे फोडण्यात एवढे व्यस्त झालेत की त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही त्यामुळे राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा त्याग करावा. त्यात अजित पवारांनी घेतलेला निर्णय कुटुंबियांनाच आवडला नाही तर जनतेला कसा आवडेल? त्याच उत्तर याच निवडणुकीत मिळेल.. शिवाय भाजप ला लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची गरज असूनही जागावाटपा मध्ये त्यांना मोजक्या जागा दिल्याने आतापासूनच अजित पवार आणि शिंदे यांना भाजपने दाबण्यास सुरवात केली आहे, विधानसभा निवडणुकीपर्यंत तर यांना युतीमध्ये काहीच किंमत राहणार नाही. असे रोहित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचं स्वागत व मनापासून अभिनंदन करायला पाहिजे.. आम्ही वयाने लहान असूनही आम्हाला कुणाबरोबर राहायचं हे कळतंय आणि ते जनतेलाही आवडतंय ते पवार साहेबांच्या आजच्या आंबेगाव येथील जाहिर सभेतून आणखी स्पष्ट होईल पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठतेने काम करून शहरातील विविध प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे काम करावे त्यासाठी शहर कार्यकारणी मध्ये अनेक तरुणांना येत्या काळात संधी देण्यात येईल असे रोहित पवार म्हणाले. महापालिकेची धन्वंतरी योजना बंद करून विमा योजना लागू करण्यात आल्याचा मुद्द्यावरून आयुक्त शेखर सिंह यांनी यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन धन्वंतरी योजना पूर्ववत करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

यावेळी प्रकाश आप्पा मस्के, रविकांत वर्पे, विकास लवांडे, तुषार कामठे शहराध्यक्ष, देवेंद्र तायडे, सुलक्षणा शिलवंत धर , गणेश भोंडवे, अरुण थोपटे, सागर चिंचवडे, ज्ञानेश आल्हाट, विशाल जाधव, मयूर जाधव, अल्ताफ शेख, माधव पाटील, संजय पडवळ, काशिनाथ जगताप, विनोद धुमाळ, शौल कांबळे, संदेश जगताप, रेजिना फ्रान्सिस, जयंत शिंदे, गणेश भांडवलकर, अजय पिल्ले, प्रतीक जम, गणेश काळे, वंदना आरक, सतीश कांबळे, योगेश सोनवणे, विवेक विधाते, राजू खंडागळे, के डी वाघमारे, काशिनाथ बामणे, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ तसेच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *