भोसरी:- अत्याधुनिक वैद्यकीय त़त्रज्ञान आणि उपचार पद्धती चा उपयोग सर्वसामान्यांना झाला पाहिजे. त्यासाठी या सेवा सर्वसामान्यपणे माफक दरामध्ये द्यावेत. कोणतेही दुखणे अंगावर न काढता त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे .असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षण तज्ञ समाजसेवी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी स्वस्तिक डेंटल केअर च्या तेविसाव्या आरोग्य दिन व वर्धापन दिन औचित्य साधून आयोजित स्नेह मेळाव्यात प्रसंगी आपले मत व्यक्त केले. यावेळी प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ विश्वास पाटील ,डॉ संतोष शिंगोटे ,हास्य अभिनेते बंडा जोशी ,श्री क्षेत्र आळंदीचे माजी शहराध्यक्ष सुरेश काका वडगावकर ,राजगुरुनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष प्रकाश गदिया , उद्योजक रामदास जैद ,मारुती येळवंडे , जैन सोशल फेडरेशन चे राजेंद्र धोका, भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष सुरेश गदिया, ह भ प दिगंबर ढोकले महाराज ,पिंपरी चिंचवड शहरातील जैन श्रावक संघाचे विविध पदाधिकारी, गौतम निधी फाउंडेशनचे पदाधिकारी, मा नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ पाटील यांनी मौखिक आरोग्याचे महत्त्व प्रतिपादन केले मानवी शरीरामध्ये होणाऱ्या विविध आजारांची प्रथम ओळख दंतवैद्यकीय तज्ञांना होते .प्राथमिक काळजी घेतल्यास मोठ्या आजारांचा धोका आपण टाळू शकतो .असे मत व्यक्त केले संचालक डॉ . प्रशांत गदिया यांनी दंत वैद्यकीय उपचार माफक दरात सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावेत यासाठी विविध योजना ची आणि ग्रामीण भागात आयोजित शिबिरांची माहिती दिली , डॉ पगारिया यांच्या शुभहस्ते डॉ प्रशांत गदिया यांनी केलेल्या वैद्यकीय व सामाजिक कार्याचा गौरव राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल शाल ,श्रीफळ ,स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.