पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी ११ ते २ यावेळेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, कै.सुमनताई बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महिन्याच्या प्रत्येक शनिवारी संदीप वाघेरे जनसंपर्क कार्यालय, तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव याठिकाणी सकाळी ११ ते २ यावेळेमध्ये करण्यात आले आहे.या मोफत आरोग्य शिबिरामध्ये अनियमित रक्तदाब,मधुमेह,हृदय रोग ,बालरोग, त्वचा विकार,किडनी विकार,मेंदू, कॅन्सर, होमिओपॅथी, वेरीकोस वेन्स व नेत्र तपासणीमध्ये काचबिंदू,मोतीबिंदू,डोळ्यांच्या मागचा पडदा, डोळ्यावरील मांस येणे, नासरू व डोळ्याचा तिरळेपणा, ल्यासिक सर्जरी आजारांवर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
शिबिरासाठी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड व डॉ चाकणे आय हॉस्पिटल पिंपळे सौदागर यांचे सहकार्य लाभले असून कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचच्या करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ९६७३४९४१४९/९१४५४९४१४९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे तसेच या शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.