प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पुणे पिंपरी चिंचवडच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, माधव सहस्रबुद्धे याचा सत्कार…
पिंपरी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पुणे पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भा.वी.कांबळे पत्रकार कक्षामध्ये ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के तसेच माधव सहस्त्रबुद्धे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के यांची ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली असून त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी महासम्राज्ञी येसूबाई साहेब ग्रंथ लिहून ५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित केला. या ऐतिहासिक पुस्तकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. पत्रकार शिर्के यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे गोल्ड मेडल व पारितोषिक प्राप्त झाले आहे.
पत्रकार दिनाचे औचीत्य साधून यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे यांचा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भाप कर म्हणाले कार्यपालिका न्यायपालिका, प्रशासन, मिडिया या चार स्तंभांपैकी प्रशासन पूर्ण भ्रष्ट आहे, कार्यपालिका मध्ये प्रतिनिधी कशाप्रकारे काम करतात हे आपल्याला माहित आहे, न्यायपालिका बरी असून सुता सारखी सरळ नाही, माध्यमांची जबाबदारी आधी देश नंतर समाज शेवटी स्वतः चा विचार याला प्राधान्य द्यावे लागेल. राम आपल्या हृदयात आहे रामाच्या नावावर गलिच्छ राजकारण चालू आहे ते योग्य आहे का ? असा सवाल करत पत्रकारांना यांच्यावर परखडलेले व्यक्त होता आले पाहिजे याचे चिंतन करण्याची गरज आहे असा सल्ला दिला.
ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारांचा सत्कार करणे स्तुत्य उपक्रम आहे. महासम्राज्ञी येसूबाई साहेब यांचे कर्तुत्व महान त्यांच्या संघर्ष जीवनावर हा ग्रंथ लिहिला आहे.
ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, पत्रकारितेमध्ये विश्वासहर्ता जपताना दोन्ही बाजूंनी मांडणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्यथा बातमी टाकून दोन मिनिटांनी काढावी अशी बातमी पत्रकाराने देऊ नये, शिवाय पत्रकाराने अधिक जबाबदारीने वागावे असाही यावेळी सल्ला दिला. पहिले देशावर प्रेम नंतर समाजावर आणि शेवटी स्वतःकडे पाहिले पाहिजे असेही सहस्त्रबुद्धे यावेळी म्हणाले.
यावेळी प्रकाश जाधव, विशाल जाधव, काशिनाथ नकाते, सतीश काळे, वसंतराव पाटील, धनाजी पाटील, तायडे सर, ब्रह्मानंद जाधव , गणेश भांडवलकर, शरद थोरात, संजय जाधव इ .मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महिला शहराध्यक्ष सौ.मंदा बनसोडे, अध्यक्ष-उत्तम खंडागळे, उपाध्यक्ष- आयु उषा लोखंडे, सचिव निर्मला जोगदंड, सहसचिव संतोष साळवी, संजीवनी कदम तसेच पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.