पिंपरी (दिनांक : ०९ डिसेंबर २०२३) पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या आजपर्यंतच्या आजी – माजी अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून सोमवार, दिनांक ११ डिसेंबर २०२३ पासून नेहरूनगर येथील न्यायालयात नवीन चार प्रथमवर्ग न्यायधीश कार्यरत होत आहेत, अशी माहिती पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिली. बी. डी. चोखट, ए. एम. बागे, एम. ए. आवळे आणि व्ही. एन. गायकवाड असे नवीन चार प्रथमवर्ग न्यायधीश कार्यभार स्वीकारत आहेत. त्यामुळे न्यायालयीन कामकाज जलदगतीने होणार असून खटल्यांचा निपटारा वेगाने होईल, असेही ॲड. रामराजे भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *