पिंपरी :- कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मा नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी आयोजित केलेल्या डॉ संजय उपाध्ये यांच्या “मन करा रे प्रसन्न” व्याख्यानाला उस्फुर्त प्रतिसाद…
या कार्यक्रमाप्रसंगी जमलेल्या एक हजार श्रोत्यांना डॉ उपाध्ये यांच्या कवितांचे वाटप करण्यात आले. डॉ उपाध्ये यांनी सर्व नागरिकांना आपल्या विचार-सरणीमधून मंत्रमुग्ध केले. तसेच लोकांचे मनोरंजन केले .
या प्रसंगी आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक सर लांडगे , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , मा नगरसेवक राजाभाऊ गोलांडे , युवा नेते निलेश नेवाळे , स्वीकृत नगरसदस्य पांडाभाऊ भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून मा नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा व पदाधिकाऱ्यांचा डॉ संजय उपाध्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
