पिंपरी :- धम्मराज साळवे हे 2017 पासून सामाजिक, राजकीय चळवळीत व शैक्षणिक कार्यात सक्रिय आहेत. 2015 झाली त्यांनी समाजातल्या गरजू गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेची स्थापना केली. रयत विद्यार्थी विचार मंच संस्था शैक्षणिक क्षेत्रात 2015 पासून कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फिस, कागदपत्रांची अडवणूक, विद्यार्थी व पालकांची फसवणूक, करिअर मार्गदर्शन करणे अश्या गोष्टींवर ते काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलने, सातत्याने शासन प्रशासन स्तरावर विद्यार्थी, कामगार, आर्थिक दुर्बल घटकांसाठी भूमिका घेणे, विद्यार्थ्यांना मदत करता यावी यासाठी वही  पेन संकलन अभियान अश्या अनेक उपक्रमांनी सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करीत असतात. अनेक सामाजिक अन्याय अत्याचार याच्या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन, मोर्चे या मध्ये सक्रिय सहभाग घेऊन लढत असतात.

 

या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल  धम्मराज साळवे यांना भीमशक्ती संघठना पुणे जिल्हा आयोजित कार्यक्रमात क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले सभागृह येथे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब , माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, आयोजक सूरज गायकवाड यांच्या यांच्या हस्ते भीम शक्ती युवा गौरव  पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष शिंदे ,श्वेता ओव्हाळ , अतुल वाघमारे , विक्रांत शेळके व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *