पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून, या बाबत अनेक नागरीकांनी, सामाजिक संघटनांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. पण या तक्रारीकडे महापालिका प्रशासनाने या विभागातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालत या प्रकारणाकडे दुर्लक्षच केले आहे. यामध्ये औद्योगिक मिळकतीच्या चुकीच्या पध्दतीने लावलेल्या नोंदी, मोबाईल टॉवरच्या नोंदीत नियमांचा केलेला भंग, व्यावसायीक नोंदी अशा विविध प्रकरणातून माहापालिकेचे जवळपास पाचशे कोटी रुपयाचे नुकसान करसंकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी केले आहे. या बाबत देशमुख यांनी भोसरी विधानसभेच्या राजकीय व्यक्तिंच्या पाठींब्याने अनेक भ्रष्ट प्रकरणे मार्गी लावून सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली आहे.
यामुळे त्यांच्या कार्यकाळातील अनेक फाईलची सखोल तपासणी व त्यांच्या बाबत केलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करावी. चौकशीअंती आपणास अशी अनेक प्रकरणे उघडकीस येतील. असे अधिकारी हे प्रशासकीय महत्वाच्या पदावर असणे हे नागरीसेवेसाठी घातक आहे.तरी वरील विषयानुसार पिंपरी चिंचवड करसंकलन विभागातील निलेश देशमुख यांच्या कार्यकाळातील सर्वच निर्णायाची व व्यावसायीक,औद्योगिक नोंदीच्या सर्वच फाईलची काटेकोरपणे चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी.त्यांची चौकशी होईपर्यंत त्यांच्याकडून करसंकलनाचा चार्ज काडून घ्यावा . अन्यथा सावध होऊन मागील प्रमाणे आनेक पुरावे नष्ट करण्याचे काम ते करत असतात. यासाठी त्यांनी विभागात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची व गुंड लोकांची एक टोळीच तयार केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडू सर्वसामान्य नागरिकांच्या 65 मिळकती जप्त केल्या जातात परंतु धनदांडगे यांचे शेकडो कोटींचा मिळकत कर थकलेला असुनसुद्धा त्यांचेवर कारवाई होताना दिसत नाही त्यांना अभय दिले जाते . दादा आपण सामान्य नागरीकांना वाचवा अशी माझ्याकडून सर्व गरीब कष्टकरी वर्गाचा प्रतिनिधी म्हणून विनंती आहे.आपणाकडून सदर प्रकरणी दखल घेतली नाही तर आम आदमी पार्टी येत्या निवडणुकीत प्रशासत काळातील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे करू असे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन तक्रार केली. त्यावर दादांनीही लवकरच कर संकलन विभागातील भ्रष्टाचाराची व निलेश देशमुख यांचा भ्रष्टाचाराची चौकशी करू अशी आश्वासन दिले निलेश देशमुखची चौकशी करू असे आश्वासन दिले असे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.
