पिंपरी :- नुकतीच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आझमभाई पानसरे यांची शरद पवार यांच्यासोबत भेट घडवून आणली, त्यांचे समर्थन मिळवले. आता भाजपचे आणि एके काळचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्वीय सहाय्यक सतीश दत्तात्रय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.ते आठ वर्षे आमदार जगताप यांच्याकडे होते. आज त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल समन्वयक पदाचे नियुक्ती पत्र आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. सतीश कांबळे हे 28000 कॅन्सर पेशंट तसेच 58 किडनी ट्रान्सप्लांट रुग्णांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत. शहरातून असा माणूस प्रदेश राष्ट्रवादीवर असल्याने शहरातील रुग्णांना याचा नक्की फायदा होईल असे तुषार कामठे म्हणाले.
तुषार कामठे हे पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते पुढे येत आहेत. कांबळे यांच्या प्रवेशाने भाजपाची
चिंता वाढली हे नक्की. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे उपस्तिथ होते.
