भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव यांचे आवाहन
पिंपरी (प्रतिनिधी) – वीर सुपुत्र, थोर समाजसुधारक, तेजस्वी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघात बुधवार (दि.12) वीर सावरकर गौरव काढण्यात येणार आहे. या गौरव यात्रेत भोसरी विधानसभेतील सर्व शिवसेना पदााधिकारी, शाखा प्रमुख, शिवसैनिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी केले.

‘सावरकर गौरव यात्रे’च्या तयारीसाठी भोसरी विधानसभेतील शिवसेना पदाधिका-यांची मंगळवारी (दि.11) बैठक पार पडली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख रामदास गाढवे, संघटक बळीराम जाधव, युवा उपशहर प्रमुख रोहित जगताप,युवा उपशहर प्रमुख युवा दत्ता औरळे , दिघी भोसरी चऱ्होली विभाग प्रमुख किशोर सवाई, युवा संघटक अभिजित लांडगे, आशिष गौड, युवा समन्व्यक प्रदीप बालघरे वाहतूक आघाडी उप प्रमुख समीर नदाफ, व्यापारी आघाडी प्रमुख जमाल अहमद चौधरी, भोसरी विधानसभा समन्वयक गौरी शेलार, रुपीनगर शाखा प्रमुख राहुल पिंगळे, विभाग प्रमुख दिनकर जाधव आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव म्हणाले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. यामुळे वीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भोसरी विधानसभेत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत आपल्या सर्व शिवसेना पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शिवसेना पक्ष संघटन, विस्तार, पक्षवाढीवर चर्चा करण्यात आली. पक्ष विस्तार आणि कामकाजांचा आढावा घेण्यात आला. पक्षात प्रवेश करणा-या इच्छुकांवर चर्चा करण्यात आली.
बुधवार, दि. १२ एप्रिल रोजी ही यात्रा होणार आहे. सायंकाळी ५ वाजता भोसरी चौकातून यात्रेला प्रारंभ होईल. भोसरी चौक- दिघी रोड- आळंदी रोड- मार्गे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे समारोप होईल. त्यानंतर नितीन आपटे यांचे व्याख्यान होणार आहे.
