सांगवी :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान, लेवा पाटीदार मित्रमंडळ आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. पंकज पाटील आणि संदीप तापकीर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ या संशोधित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आहे. नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, काटेपुरम्, नवी सांगवी येथे रविवार, दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०४:०० वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. जळगाव विधानसभा आमदार सुरेश तथा राजूमामा भोळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन होईल. आमदार अश्विनी जगताप, भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, किर्लोस्कर अॉईल इंजिन लिमिटेडचे कारखाना व्यवस्थापक युवराज पवार, किर्लोस्कर अॉईल इंजिन एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष चंद्रकांत गोरे, माजी महापौर उषा ढोरे, स्थायी समिती माजी सभापती प्रशांत शितोळे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, शारदा सोनवणे आणि संतोष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी प्रा. कमल पाटील ‘मी श्यामची आई बोलते हो!’ हा एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. प्रवेश विनामूल्य आहे. काही जागा राखीव असून प्रथम येईल त्यास प्राधान्य आहे. सर्व रसिकांनी या सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन मधुकर बोरोले, भागवत झोपे आणि विशाल सोनी यांनी केले आहे.
