पिंपरी :- पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, प्रमुख सल्लागार शिवाजीराव शिर्के, सरचिटणीस सुरेश कंक, सुभाष चव्हाण, मनोहर दिवाण, वसंत कोल्हे, सोमनाथ कोरे, पंकज पाटील यांनी गुणवंत कामगार यांच्या सप्रेम मागणीचे पत्र मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना दिले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र दिले.
गुणवंत कामगारांना दिलेले विशेष कार्यकारी अधिकारी पद विशिष्ट कालावधीने न बदलता हयातभर ठेवावे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कामगारांना त्वरित १०,००० रुपये पेन्शन चालू करावी.याची अंमल बजावणी व्हावी. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, गावो गावच्या ग्रामपंचायती इथे गुणवंत कामगारांना पाच वर्ष काम करण्याची प्राधान्याने संधी मिळावी. एस. टी. बस, रेल्वे येथील प्रवासात १०० टक्के सवलत जाहीर करावी. गुणवंत कामगारांना विमा संरक्षण मिळावे. अशा मागण्या या पत्रातून पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीने केल्या आहेत.
याबाबत बोलताना गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे म्हणाले की, “स्वतःची पदर मोड करून आजही महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कामगार विविध क्षेत्रात सामाजिक सेवा मनोभावे करीत आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योग्य ती पाऊले उचलावीत.”