– शास्तीकर संपूर्ण माफीने १ लाख मिळकतधारकांना दिलासा

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्याला पूर्णत्व मिळाले आहे. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र, तसा ‘जीआर’ निघाला नव्हता. अखेर शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने पूर्णमाफ केल्याचा ‘जीआर’ राज्य सरकारने काढला आहे. गेल्या १४ वर्षांपासूनचा शास्तीकराचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटला आहे.

भारतीय जनता पार्टीचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शास्तीकर माफीसाठी राज्य सरकारकडे यशस्वी पाठपुरावा केला. अखेर पिंपरी-चिंचवडकरांच्या लढ्याला यश मिळाले. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर माफीची घोषणा केली होती. आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली होती. त्यामुळे शहरातील सुमारे १ लाख मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *